Published On : Sat, Jul 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेल्या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला अटक

Advertisement

नागपूर : शहरातील दोन व्यवसायिकांची गोळ्या झाडून हत्या करून त्यांचे मृतदेह जाळून नदीत फेकण्यात आले. हा थरार कोंढाळी येथील फार्महाऊसवर मंगळवारी २५ जुलैला घडला.

निरालाकुमार सिंग (४२, रा. पारडी, एच.बी. टाऊन) आणि अंबरीष गोळे (४०, रा. सोनेगाव) अशी मृत व्यावसायिकांची नावे आहेत. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. शुक्रवारी या प्रकरणात सहावा आरोपी अटक केला . विशाल पुंज असे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या सहाव्या आरोपीचे नाव असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंबरीश गोले (वय ४०, रा. नरकेसरी ले-आउट, जयप्रकाशनगर) आणि निरालाकुमार सिंग (वय ४३, रा. प्रसाद अपार्टमेंट एचबी टाउन, पारडी) अशी हत्या झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. ओंकार तलमले (वय २५, रा. स्मृती ले-आउट), लकी तुर्केल (वय २२, रा. मरियमनगर), हर्ष वर्मा (वय २२, रा. वाडी), दानिश शिवपेठ (वय २१, रा. गोधनी) आणि हर्ष बागडे (वय १९, रा. दत्तवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना या हत्याकांडातील दुसरा मृतक निरालाकुमार याचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असून दीड कोटी रुपयांचा डीडी दिल्यास २.८० कोटी रुपये रोख देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी या दोन व्यावसायिकांची हत्या केल्याचे समोर आले .

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.