Published On : Sat, Oct 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या!

15 दिवसांपूर्वी मिळाली जीवे मारण्याची धमकी
Advertisement

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, त्यांच्यावर तीन व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता.आज 12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता.
मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर एसआरए प्रकल्पातून गोळीबार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement