| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 26th, 2018

  बी.ओ.टी. आणि पी.पी.पी. तत्त्वावरील प्रकल्पांच्या कामाला गती द्या


  नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित कामांना तसेच केंद्र सरकार व राज्य शासनाअंतर्गत बी.ओ.टी. व पी.पी.पी तत्त्वार होऊ घातलेल्या प्रकल्पांना गती द्या, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले. सोमवार (ता.२६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात प्रवीण दटके समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी समिती सदस्य संजय बंगाले, पिंटू झलके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, शहर अभियंता मनोज तालेवार, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, अनिरूद्ध चौगंजकर, उपअभियंता शकील नियाजी प्रामुख्याने उपस्थित होते.

  यावेळी मनपाद्वारे प्रस्तावित असलेल्या साई स्पोर्टस, ऑरेंज सिटी प्रकल्प, नागनदी प्रकल्प, सक्करदरा व महाल येथील बुधवार बाजार, खोवा व संत्रा मार्केट, डिक दवाखाना, दहन घाटांवर गोवरी व बायोमास ब्रिकेट्स इत्यादी प्रकल्पांचा आढावा प्रवीण दटके यांनी घेतला.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145