Published On : Wed, Nov 13th, 2019

टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीरसात न्हाहली रामनगरी

रामकृष्ण रथयात्रेचे हर्षोलासात स्वागत रामराज्य ढोलताश्याच्या पथकाव्दारा उत्कृष्ट वादन सादरीकरण

रामटेक : रामटेक येथे आयोजित भव्य शोभायात्रेनंतर दुसर्‍या दिवशी काकड आरती भक्त परिवारातर्फे रामरथ यात्रेचे आयोजन करण्यांत आले.रामरथयात्रेच्या स्वागताकरीता घरोघरी सडासंमार्जनासह आकर्षक रांगोळ्या काढण्यांत आल्या होत्या. फुलांची आरास व आकर्षक दिव्यांची रोशनाई करण्यांत आली होती. सायंकाळी पाच वाजता स्थानिक विठ्ठल मंदीरातून पाद्यपूजा करून रथयात्रेला सुरूवात झाली.

बॅन्ड ,घोडे तसेच आकर्षक चित्ररथ व टाळ मृदंगाचा गजर करीत दिंड्यासह पालखी व देवी देवता व संत महंताच्या प्रतिकृती असलेल्या रामरथास भक्तमंडळी दोरीने ओढून मार्गक्रमण करीत होते. कालंका माता मंदीर शितला माता मंदीर शास्त्री चौक आंबेडकर चौक, मंगळवारी वार्ड, रामाळेश्वर मंदीर गांधीचौक मार्गे रथयात्रेचे मार्गक्रमण सुरू होते रथयात्रेचे दर्शन घेण्या भक्त मंडळी,महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी चहा,अल्पोपहाराची व्यवस्था ही करण्यांत आली होती. रामराज्य ढोलताश्याच्या पथकाव्दारा उत्कृष्ट वादन सादरीकरण करण्यांत आले.

ह्यावेळी ढोल ताशा चमूने उपस्थितांचे मन जिंकले.ह्यावेळी श्रीकांत येरपुडे,मोनू रघुवंशी,डॉ. सोनल वेरुळकर, सुषमा मर्जीवे यांची उपस्थिती होती। शोभायात्रा दरम्यान रामभक्त प्रकाश कस्तुरे,डॉ. अमोल देशमुख,गोपी कोल्लेपरा, सुभाष बघेले,विजय हटवार, ऍड. महेंद्र येरपुडे,लक्ष्मण मेंघरे,निलेश पटेल, विकास तोतडे,गुड्डू बघेले, ईश्वर आकट,आनंद नेवरे,शेखर बघेले ,ऋषी किम्मतकर,विपुल मेंघरे,खरकसिंग बिसेन, ,अनुराग दुबे, छोटू चोपकर,ताराचंद चौकसे, सोनू धावडे, पिंटू शर्मा, प्रशांत किम्मतकर, भावीन पटेल ,उमेश पटेल,अपूर्व कोलेपरा आदी भाविक जय श्रीराम , जय जय श्रीराम च्या राम नामाच्या गजरात रामकृष्ण रथयात्रेत तल्लीन झाले होते.

ढोल ताशांच्या गजरात भक्ती रसात रामनगरी न्हाहली होती.

ह्यावेळी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक आलोक मानकर ,प्रवीण मानापुरे, नगरसेविका कविता मूलमुले, लता कामडे ,चित्रा धुरई, पद्मा ठेंगरे,डॉ. रुचिका देशमुख,ज्योती कोल्लेपरा, सविता बाणते,प्रियंका पटेल,सह महिलांचा ऊत्स्फुर्त सहभाग होता. रामतलाई धार्मिक मैदान येथे रथयात्रेचे समापन करण्यात आले.