Published On : Sat, Nov 2nd, 2019

भिलगाव येथील अवनी काळे मिस किड्स स्लग:-इंटरनॅशनल युनिव्हर्स पुरस्काराने सन्मानित

कामठी : विविध गुणवैशिष्ट याकरिता अनेक पुरस्कार प्राप्त करणारी अवनी काळे हिने आग्रा येथे आयोजित 9 ते15 वर्ष वयोगटातील मिस किड्स इंटरनॅशनल तसेच बेस्ट किड्स मॉडेल अवार्ड हे पुरस्कार प्राप्त केले आहे हा पुरस्कार पटकावणारी अवनी हिने देशात नागपूरचे नावलौकिक केले आहे .

खुषी इव्हेंट्स च्या वतीने आग्रा येथे ओरियंट लॉज मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत आशिया खंडातील एकूण 50 स्पर्धकवर आघाडी घेत हा पुरस्कार प्राप्त केला तसेच बेस्ट चाइल्ड मॉडेल बेस्ट स्माईल हे पुरस्कार प्राप्त केले यात अनेक देशातून स्पर्धक सहभागी झाले होते प्रसिद्ध गायक जशी गील बबल राय अभिनेता प्रियांक शर्मा व अभिनेत्री अनमोल चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला अवनी ब्रह्मा काळे ही भिलगाव ची रहिवासी असून दिल्ली पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी आहे

तिने आतापर्यंत प्रिन्सेस विदर्भ नागपूर मिस आयकॉन मिस ग्लॅमरस मैसूर तसेच देश पातळीवरचे मॉडलिंग कॉन्टेस्ट पुरस्कार आपल्या नावावर केली आहे अवनी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की नृत्य अभिनय मॉडेलिंग स्विमिंग कराटे अधिक ची तयारी करत असून माझ्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनात आणि माझ्या परिश्रमाने मला बेस्ट मॉडेल आणि मिस युनिव्हर्स तसेच डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला योग्य मार्गदर्शनाखाली तिच्या मार्ग प्रशस्त करण्याची मनीषा आई लतेशवरी काळे व वडील ब्रह्मा काळे यांनी बोलून दाखवली

संदीप कांबळे कामठी