Published On : Sat, Jul 13th, 2019

ऑटोचालक चोरट्यास अटक, चोरीस गेलेला ऑटो जप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील ग्रीन शाईन लॉन मधील एका लग्न समारंभ कार्यक्रमातील वाहनताळातून लॉक केलेला एक तीन सीटर ऑटो क्र एम एच 49 ई 5183 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 20 जून ला रात्री साडे दहा वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी ऑटोचालक अजहर अली वल्द नौशाद अली वय 36 वर्षे रा. आदर्श नगर उमरेड रोड नागपूर ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा नोंदवीत तपासाला गती देण्यात आली दरम्यान पोलीस गस्त वर कळमना रोड मार्गे फिरत असता चोरीस गेलेल्या वर्णनाचा तीन चाकी ऑटो कळमना रोड कडे भरधाव वेगाने जात असता त्या संशयित ऑटो चालकाला ताब्यात घेत पोलीस खाकी दाखवताच आरोपी ने सदर ऑटो चोरीचा असल्याची कबुली करीत ऑटो चा नंबर प्लेट बदलवून चालवीत असल्याचे निदर्शनास आले यासंदर्भात ऑटोचालक चोरट्याचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही दुपारी दीड वाजता करण्यात आली असून अटक आरोपीचे नाव जावेद खान वल्द अश्फाक खान वय 26 वर्षे रा गिट्टीखदान नागपूर असे आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जून ला कामठी कळमना रोड वर असलेल्या ग्रीन शाईन लॉन मध्ये फिर्यादी अजहर अली चा मित्र शेख गाजी यांच्या बहिणीचा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ऑटो क्र एम एच 49 ई 5183 ने आले असता ऑटो वाहनतळात लावून लग्नसमारंभ कार्यक्रमात व्यस्त होते कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी ऑटो जवळ आले असता लॉक असलेला ऑटो दिसेना शोध करूनही ऑटो चा कुठेही थांगपत्ता न लागल्याने स्थानिक पोलीस स्टेशन ला ऑटो चोरीची तक्रार नोंदविली यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवीत या चोरीप्रकरणाचा छडा लावण्यात अधिक गती दिली असता कळमना रोड मार्गे एक संशयित ऑटो जाताना दिसताच त्या ऑटोवरील काच वर मूळच्या वर्णनाचा असलेला वाघाचे चित्र खोडलेले दीसले यावर अजून विचारपूस करीत ऑटो चे कागदपत्रे विचारले असता कागदपत्रे सुद्धा नसल्याचे सांगितले तेव्हा खाकी वर्दीचा वचक दाखवताच आरोपीने सदर ऑटो चोरीचा असून ग्रीन शाईन लॉन मधून राजा खान वल्द अल्ताफ खान यांच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली दिली तसेच या चोरट्याने ऑटो ची मूळ नंबर प्लेट असलेली एम एच 49 ई 5183 बदलवून एम एच 49 ए आर 6685 असे लावून तसेच चेसिस क्र एम डी 2 ए 48ए23जीडब्लूबी 21114 व इंजिन क्र ए 22 डब्लू जीबी97929 असे दिसून आले व या बनावटी नंबर प्लेट वर बिनधास्तपने ऑटो चालविणे सुरू होते मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छळा लावून आरोपीला अटक करण्यात यश गाठून चोरीस गेलेला ऑटो सुद्धा जप्त करण्याची यशस्वी कारवाही केली.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही यशस्वी कारवाहो डीसीपी हर्ष पोद्दार व एसीपी राजेश परदेसी यांच्यामार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल, दुय्यम पोलीस निरीक्षक आर आर पाल, पोलीस उपनिरीक्षक कांडेकर, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव,राजा टाकळीकर, सतीश ठाकूर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement