Published On : Mon, Apr 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचार; आरोपीला जन्मठेप कायम

Advertisement

नागपूर : साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्ध आरोपीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीची अपील फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे आरोपीला दिलासा मिळण्याची शक्यता पूर्णतः संपुष्टात आली आहे.

न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. ही अमानुष घटना अकोला जिल्ह्यात १० नोव्हेंबर २०१८ रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपी यादव अर्जुन डोंगरे (वय ७७) याला ९ जून २०२१ रोजी सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

या शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला आणि आरोपीची अपील फेटाळली.

सत्र न्यायालयात अभियोजन पक्षाने एकूण १० साक्षीदार सादर केले होते. याशिवाय वैद्यकीय अहवालातूनही अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आरोपीनेच हा घृणास्पद गुन्हा केल्याचे सिद्ध झाले.

Advertisement

या प्रकरणात शासनाच्या वतीने अॅड. अनुप बदर यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयात बाजू मांडली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.