Published On : Sat, Apr 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; नागपुरात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल, एकाला अटक

Advertisement

नागपूर : शहरात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या असून, यामुळे खळबळ उडाली आहे. एका प्रकरणात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी संबंधित गुन्ह्यात अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, गणेशपेठ पोलिसांनी नंदनवन येथील २७ वर्षीय हर्षल अरविंद रेवणकर याला अटक केली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी यांच्यात २०२१ पासून ओळख होती आणि पुढे त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र, महिलेने लग्नानंतरच संबंध ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली होती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर आरोपीने तिला सेंट्रल अव्हेन्यूवरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे जबरदस्तीने मद्यपान करायला लावून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर त्या अवस्थेत आरोपीने अश्लील फोटो आणि व्हिडिओही काढल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे या फोटो आणि व्हिडिओंचा आधार घेत आरोपीने महिलेला धमकावत पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges