नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली होती. त्यामुळे निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.यातच आता भारतीय निवडणूक आयोग आज (15 ऑक्टोबर) परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला आहे.सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.










