महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. उमेदवार असो की मतदार नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनतेचा कौल कोणाच्या बाजूने याकरिता सकाळी ८ वाजता पासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांतून कोणता उमेदवार विजयी होणार हे पाहावे लागले. यातच नागपूर जिल्ह्यातील ग्रामीणच्या सहाही मतदार संघाची आकडेवारी समोर आली आहे.
नागपूर ग्रामीण मतदारसंघ कोणता उमेदवार आघाडीवर –
1. सावनेर मतदारसंघ – भाजपचे आशिष देशमुख 5609 मतांनी आघाडीवर
2. काटोल – चरणसिंह ठाकूर 9759 मतानी पुढे
3. उमरेड मतदारसंघ – संजय मेश्राम (काँग्रेस) 5593 मतांनी आघाडीवर
4. कामठी मतदारसंघ – सुरेश भोयर (काँग्रेस) 1433 मतांनी आघाडीवर
5. हिंगणा मतदारसंघ – समीर मेघे (भाजप )13439 मतांनी आघाडीवर
6 रामटेक मतदारसंघ – आशिष जैसवाल (शिवसेना ) 3302 मतांनी आघाडीवर