
नागपूर : शहरातील गिट्टीखदान परिसरात एका ४४ वर्षीय व्यक्तीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सुरेश जोहरसिंग चव्हाण (वय ४४, रा. गौतम नगर, भिवसेनखोरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल प्रवीण पाटील (१९, दहेगाव-कालमेश्वर), सोहेल उर्फ चिकू सलीम खान (१८, गिट्टीखदान), दीपक लक्ष्मीप्रसाद बिसेन (२३, डाभा, गिट्टीखदान) आणि पवन किशोर वर्धे (१९, नर्मदा सोसायटी, गिट्टीखदान) हे त्यांच्या मुलाच्या ओळखीचे होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास आरोपी ५ ते ६ साथीदारांसह चव्हाण यांच्या घराजवळ जमले होते. त्यांच्या हातात चाकू, कुऱ्हाड, काठ्या आणि तलवार अशी धोकादायक शस्त्रे होती.
अज्ञात कारणावरून त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून तक्रारदार व त्यांच्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मुलगा घरी नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी चव्हाण यांच्यावर कुऱ्हाड व तलवारीने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर घरातील वस्तूंची तोडफोड करून मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी चव्हाण यांना तात्काळ मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा प्रयत्न, घरफोडी आणि धमकी देणे यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जलद कारवाई करत चारही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




