| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 11th, 2019

  युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष पदी आशिष हुड यांची नियुक्ती

  कन्हान : – मा. राजेंद्र मुळक अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व माजी राज्यमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय कन्हान येथे टेकाडी चे रहिवासी युवा आशिष हुड यांची युवक काँग्रेस कमेटी पारशिवनी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा राजेंद्र मुळक हयानी पुष्पगुच्छ देऊन आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. आणि काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी जोमाने कार्य करू असे कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले.

  याप्रसंगी दयारामजी भोयर, जोध गुरुजी, देवचंद चकोले, प्रवीण शेलारे ,अमोल प्रसाद, शक्ति पात्रे, मोहसीन खान, मनीष भिवगडे, इमरान शेख, सतिश भसारकर, बैसाखू जनबंधू, राहुल टेकाम, पवन कुंभलकर, चेतन कुंभलकर, कुशल पोटभरे, ढगे गुरुजी, फरकाडे काका, गौतम नितनवरे, गणेश भालेकर, मधुकर गणवीर, दिनेश नारनवरे आदीने पक्ष श्रेष्ठी चे आभार व्यकत करून आशिष हुड च्या नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी युवक कॉंग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145