
नागपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने आयोजन करण्यात आले. कारागृह अधीक्षक वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात बंदी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींसह काढण्यात आलेली पालखी कारागृहातील विविध विभागांतून फिरविण्यात आली. या वेळी बंदी बांधवांनी पालखीचे दर्शन घेत “विठ्ठल-विठ्ठल” नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला. पालखी सोहळ्यानंतर पांडुरंगाचे अभंग, भजने आणि फुगडीच्या माध्यमातून आषाढी एकादशीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
उपवास करणाऱ्या बंदी बांधवांसाठी कारागृह प्रशासनाकडून विशेष उपवासाचे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे बंदी बांधवांमध्ये आध्यात्मिकता, सकारात्मकता आणि आत्मपरीक्षणाची भावना अधिक दृढ झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.
“सुधारणा आणि पुनर्वसन” या महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ब्रीदाला साजेशा या उपक्रमातून बंदी बांधवांच्या मनात भक्तीचा संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. खऱ्या अर्थाने, या दिवशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात “विठ्ठल नामाची शाळा” भरली असून प्रत्येक बंदी बांधव भक्तीचा विद्यार्थी बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक वैभव आगे, अतिरिक्त अधीक्षक मनोहर भोसले, श्रीमती दीपा आगे यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंदिर प्रबंधन धर्माचार्यों को सौंपने की मांग #NarendraAcharya #RamMandir #Ratnagiri #EducationNews
प्रेम संबंध के विवाद में हुआ था खूनी संघर्ष #NagpurCrime #Crime #Police...
अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल
मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...
मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral




