Published On : Mon, Jul 27th, 2020

संविधान चौकात सिटू तर्फे आशा वर्कर्स चे चेतावणी आंदोलन

Advertisement

नागपुर: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( सी आय टी यू )नागपूर जिल्हा कमिटी तर्फे संविधान चौकात राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात चेतावणी आंदोलन करण्यात आले. कोरोना सर्वेचे २०० रुपये रोज मिळावा, जे एस वाय अंतर्गत ए पी एल/ बी पी एल अट अट रद्द करून सरसकट प्रती लाभार्थी ३०० रुपये द्या, मासिक मानधन देण्यात घोळ होत असल्यामुळे पे स्लीप द्या. या विषयावर १० जुलै पासून बेमुदत कोरोना कामावर बहिष्कार आंदोलन सुरू आहे.

वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे आज चेतावणी आंदोलन करून ६ ऑगस्त पर्यंत निर्णय घ्या अन्यथा ७ व ८ ऑगस्त रोजी तीव्र कामबंद आंदोलन राज्य स्तरावर करण्यात येईल. तसेच ९ ऑगस्त रोजी राज्यभर क्रांती दिनाचे उपलक्षात जेलभरो करण्याचा इशारा देण्यात आला.

आज संविधान चौकात राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, पौर्णिमा पाटील, रुपलता बोंबले यांचे नेतृत्वात शेकडो आशा वर्कर्स उपस्थित होत्या. अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.