Published On : Mon, Aug 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील गंगाबाई घाटजवळ पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत करण्यात आले ‘हे’ बदल!

Advertisement

नागपूर, प्रतिनिधी: नागपूर शहरातील कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळाच्या हद्दीत महत्त्वाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. हत्तीनाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम मे. सुविचार कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येणार असून, हे काम येत्या ५ ऑगस्टपासून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत १५ दिवस चालणार आहे.

या काळात महाल झेंडा चौकातून गंगाबाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सदर मार्गावर नेहमीच प्रचंड प्रमाणात वाहने चालत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे-

झेंडा चौकातून गंगाबाई घाटाकडे जाणारी वाहने-
माणिकपुरा चौक → लाकडीपुल बस स्टॉप → गंगाबाई घाट

गंगाबाई घाट येथून झेंडा चौकाकडे येणारी वाहने-
मंगळवारी → आदमशाह चौक → झेंडा चौक

या अधिसूचनेचा ५ ऑगस्टपासून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रभाव राहणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त लोहित मतानी यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि वाहतुकीत होणारी अडथळे टाळावेत.

Advertisement

नागपूरच्या नागरिकांनी याकडे केवळ बंदी म्हणून न पाहता, आपल्या सहकार्यामुळे एक महत्त्वाचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल याची जाणीव ठेवावी.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.