नागपूर: भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे.नुकतेच वर्धा मतदारसंघातून तब्बल तिसऱ्यांदा रामदास तडस यांना तिकीट देण्यात आले.यातच आता तडस यांचा निवडणुकीसाठी भजपाची पोलखोल करणारा स्टिंग ऑपरेशनचा एक जुना व्हिडीओ काँग्रेसने पोस्ट केला आहे.
टीव्ही 9 भारतवर्ष’च्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंगमधून भाजप पक्षाचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी निवडणुकीत केलेल्या अवैध खर्चासंदर्भात भाष्य केले.हा व्हिडिओ 2019 मधील लोकसभा निवडणुकी दरम्यानचा आहे.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन, असे तडस या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. तसेच डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले. इतकेच नाही तर भाजपकडूनही 5 कोटी रुपये मिळाल्याची कबुली त्यांनी केली.पूर्ण निवडणूक कॅशने लढवल्या जातात, असेही ते बोलत आहेत.
दरम्यान 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना वर्धेतून उमेदवारी जाहीर होतात काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर तडस यांचा स्टिंग ऑपरेशनचा तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात भाजप कशा पद्धतीने निवडणुका जिंकत आहे. हे खासदार रामदास तडस यांनी या स्टिंग ॲापरेशनमध्ये सांगितलं आहे. भाजपचे नेते मोठ्या दिमाखात सांगत आहेत ‘अबकी बार चारसो पार’ पण आता यांना यांची जागा दाखवावी लागेल, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
रामदास तडस यांचा राजकीय प्रवास-
रामदास तडस हे भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2009 साली रामदास तडस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली वर्धा लोकसभा निवडणूक तडस यांनी भाजपमधून लढवली आणि विजयी झाले. वर्ध्यातील देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तीनवेळा काम पाहिले. त्यानंतर 2007 ते 2009 या काळात परिवहन महामंडळात तडस संचालक होते. 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, त्यांची केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
घ्या आता भाजपच्याच खासदारांनेच केली भाजपची पोलखोल. भाजप कशा पद्धतीने निवडणुका जिंकत आहे. हे खासदार रामदास तडस यांनी या स्टिंग ॲापरेशनमध्ये सांगितलं आहे. भाजपचे नेते मोठ्या दिमाखात सांगत आहेत ‘अबकी बार चारसो पार’ पण आता यांना यांची जागा दाखवावी लागेल. pic.twitter.com/M2CmCbsvub
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 26, 2024