Published On : Fri, May 10th, 2024

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा;सुप्रीम कोर्टाकडून १ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.न्यायालयाने केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिमजामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आज अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगातून बाहेर येणे ही आम आदमी पक्षासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. 25 मे रोजी दिल्लीत लोकसभेच्या निवडणुका होणार असून त्यात फक्त 15 दिवस उरले आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टी काँग्रेसच्या सहकार्याने निवडणूक लढवत आहे. निवडणुकीपूर्वी केजरीवाल बाहेर पडत असतील तर पक्षाला मोठा पाठिंबा मिळेल. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल सध्या प्रचारात व्यस्त आहेत.