नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मंत्री आतिशी मार्लेना, सुनीता केजरीवाल आणि राघव चड्डा यांची नावं आघाडीवर आहेत.
मात्र या चर्चेत मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावावर आमदारांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे थोड्याच वेळात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.