Published On : Sun, Sep 29th, 2019

दोन अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

Advertisement

कामठी :-स्थानिक , नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रीती ले आऊट न्यू येरखेडा येथून मे महिन्यात चोरीला गेलेल्या दुचाकी चा शोध लावून चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्याना अटक करण्याची यशस्वी कारवाही स्थानिक नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून त्यांचे जवळून 85 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केल्याचे कारवाई शनिवार ला दुपारी दोन वाजता सुमारास केली असून अटक आरोपींचे नावे चंद्रशेखर खोब्रागडे वय 26 वर्षे रा नरखेड, सिद्धार्थ परशुराम बन्सोड रा नांदगाव असे आहे.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीती लेआउट न्यूयेरखेडा येथील अभिषेक प्रसाद जेदिया वय 19 हे यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल क्रमांक एम एच 40 बीपी 90 83 बजाज मोटरसायकल घरासमोर लॉक करून उभी ठेवली असता आरोपी चंद्रशेखर दामोदर खोबरागडे वय 26 राहणार पीलापुर पोस्ट बेलोना तहसील नरखेड जिल्हा नागपूर व त्याच्या सहकारी सिद्धार्थ परशुराम बनसोड राहणार वाटपूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांनी 10 मे 2019 ला अभिषेक जेदिया याचे घरासमोर उभे ठेवलेलली मोटारसायकल क्रमांक 40 बीपी 90 83 बनावट चावीने चोरी करून अमरावती जिल्हा येथे घेऊन पसार झाले होते मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार अभिषेक यांनी नवीन कामती पोलीस स्टेशनला 10 मे 2019 लाच केली होती

पोलिसांनी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता नवीन कामठी पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की आरोपी चंद्रशेखर दामोदर खोबरागडे वय 26 राहणार पीलापुर पोस्ट बेलोना जिल्हा नागपूर हा मोटारसायकल घेऊन गावात फिरत असल्याची माहिती खात्रीलायक वृत्त नवीन कामठी पोलिसांना मिळाले असता पोलिसांनी आरोपीच्या गाव गाठून आरोपीचा शोध घेत असला आरोपी चंद्रशेखर जवळ चोरीची मोटारसायकल दिसून येताच पोलिसांनी अटक केली

त्याने आरोपी सिद्धार्थ परशुराम बनसोड राहणार वाटपूर तालुका नांदेड नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यासोबत गाडी चोरी केल्याचे कबूल केले पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचे जोडून चोरी केलेली मोटारसायकल जप्त करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली नवीन कामाची पोलीस स्टेशनला कलम 279 नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी अटक केली वरील कारवाई पोलिस उपायुक्त नीलोत्पल ,सहाय्यक पोलिस आयुक्त राजरत्न बनसोड, ठाणेदार संतोष बाकल , दुययंम पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल,यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकलीकर, सतीश ठाकूर, उपेंद्र आकोटकर आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी