Published On : Wed, Aug 17th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सिताबर्डी मेट्रो जंक्शन येथील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणा-या मल्टीमिडीया भव्य छायाचित्र प्रदर्शनाला सुमारे दीड लाख लोकांची हजेरी

Advertisement

केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम

नागपूर – आजादी का अमृत महोत्सव निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, महामेट्रो नागपूर व रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सिताबर्डी येथील मेट्रो जंक्शन येथे आयोजित केलेल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे, तसेच हर घर तिरंगा, बुस्टर लसिकरण या भव्य मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाला मागील चार दिवसात सुमारे दीड लाख नागरीकांनी हजेरी लावून प्रदर्शनाची पाहणी केली.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पहिल्या दिवशी प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी महामेट्रो नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरणचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणेचे उपसंचालक निखील देशमुख, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशीन राय, सहायक संचालक हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रदर्शनाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.

या प्रदर्शनात पहिल्या दिवशी सुमारे २० हजार नागरीकांनी हजेरी लावून पाहणी केली. त्यानंतर दुस-या दिवशी सुमारे ३० हजार नागरीकांनी भेट दिली. १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी सुमारे ९० हजार नागरीकांनी भेट दिली. आज १६ ऑगस्ट रोजी इतर नागरीकांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.

या प्रदर्शनात सन 1700 पासून ते 1947 पर्यन्‍तचा भारतीय स्‍वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक व महापुरूषांची माहिती, स्‍वातंत्र्य नंतरचा भारत एकसंघ करण्‍यासाठी केलेले प्रयत्‍न, भारताचा संविधान, स्‍वतंत्रता आंदोलनातील प्रमुख स्‍थळ, भारत सरकारने केलेल्या विकास कामांबाबत मा. प्रधानमंत्री नरेन्‍द्र मोदीजी यांचा संदेश अशी विविध प्रकारची माहिती सांगणारे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे भव्य छायाचित्रांचा समावेश होता. त्याच बरोबर रस्ते वाहतुक व महामार्ग प्राधिकरणाने नागपूर व परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती असलेले छायाचित्र, महामेट्रो द्वारे नागपूरात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती असलेले छायाचित्र, भारताच्या फाळणीचा इतिहास उलगडणारे विविध माहिती सांगणारे हे प्रदर्शन १६ ऑगस्ट पर्यंत नागरीकांसाठी निःशुल्क ठेवण्‍यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख, सहायक संचालक हंसराज राऊत यांच्या नेतृत्वात तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकायला, संतोष यादव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले.

आज जिल्हाधिकारी आर. विमला यांची प्रदर्शनाला भेट
सिताबर्डी येथील मेट्रो जंक्शन येथे लावण्यात आलेल्या आजादी का अमृत महोत्सव या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी आर. विमला यांनी भेट देऊन पाहणी केली. हे प्रदर्शन नागरीकांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगण्यासाठी फार उपयुक्त आहे. नवीन पिढीला या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती सांगणारे हे प्रदर्शन आहे. नागरीकांसाठी अशा प्रकारचे प्रदर्शन नेहमी आयोजित करण्यात यावे, तसेच सरकारी विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement