नागपूर :गांजा पिण्यावरून वाद झाल्यामुळे कुख्यात गुंडाने मित्राचा चाकूने भोसकून खून केला.ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी चार वाजता टेकडी वाडीत घडली.लक्की ऊर्फ लिखित घनश्याम आडे (२८,साईनगर, दाभा) असे मृतक युवकाचे नवा आहे. तर सागर घोष (३०) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजता लक्की हा टेकडी वाडीतील मित्र विक्की लोखंडेच्या घरी दारु आणि गांजा पित बसला होता. काही वेळात आरोपी सागर घोष तेथे आला. तोसुद्धा तेथे दारू पित बसला. याच दरम्यान गांजा पिण्यावरून लक्की आणि सागरमध्ये वाद झाला. सागरने पाठीमागे लपवलेला चाकू काढला आणि लक्कीच्या मानेवर वार केला.
या हल्ल्यात लक्कीचा काही वेळातच मृत्यू झाला.
त्यानंतर सागर हा फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सागरच्या वडिलांनी मुलाला वाडी पोलीस ठाण्यात नेऊन आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.