Published On : Thu, Feb 22nd, 2018

गारपीट व वादळी पावसामुळे विभागात 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित – अनूप कुमार

Advertisement


नागपूर: वादळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर विभागातील गहू हरभऱ्यासह फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाधित झालेल्या सर्वेक्षणानुसार पाचही जिल्ह्यात 25 हजार 19 हेक्टर आर क्षेत्रातील शेती व फळ पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये सुमारे 34 हजार 588 शेतकरी सभासदांचा समावेश असून 35 कोटी रूपये नुकसानीपोटी अनुदान देने अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.

विभागात मागील 11 ते 13 फेब्रुवारी रोजी वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 33 ते 50 टक्के मध्ये 5हजार 611.44 हेक्टर आर क्षेत्रातील 9 हजार 537 शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना 7 कोटी 26 लाख रूपयाचे नुकसानीचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. नुकसानी संदर्भाचा संपूर्ण अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.

गारपिटीमुळे व वादळी पावसामुळे 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील 15 हजार 746.31 हेक्टर आर क्षेत्रातील 18 हजार 459 बाधीत शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईपोटी एकून 23कोटी 81 लक्ष रूपयांपेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे. वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 479 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 3 हजार 792 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अनुदान वितरणासाठी 3 कोटी 52लक्ष रूपये निधी अपेक्षीत आहे. भंडारा 1 हजार 85 हेक्टर बाधीत क्षेत्र 3हजार 992 शेतकरी 99लाख 90हजार निधी अपेक्षीत आहे. गोंदिया जिल्हा 2हजार844.38 हेक्टर क्षेत्र बाधीत 4हजार376 शेतकरी 34लाख 96 हजार निधी अपेक्षीत आहे. चंद्रपूर जिल्हा 2 हजार 849 हेक्टर क्षेत्र बाधीत 3हजार 964 शेतकरी बाधीत 31लाख 58 हजार निधी अपेक्षित आहे तर गडचिरोली जिल्ह्यात 14.74 हेक्टर क्षेत्र बाधित 15 शेतकरी 1लाख रूपये अनुदान वाटपासाठी निधी अपेक्षीत आहे.

50 टक्केपेक्षा कमी बाधीत क्षेत्र
वादळीपाऊस व गारपीटीमुळे शेती व फळ पीकांच्या 33 ते 50 टक्के मधील नुकसानीमध्ये विभागातील 5हजार 661.44 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधितांमध्ये 9हजार 537 बाधीत शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधीत क्षेत्राच्या अनुदान वाटपासाठी 7कोटी 26लक्ष रूपये निधी अपेक्षीत आहे.

विभागात 33 ते 50 टक्के क्षेत्राच्या नुकसानीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 1हजार39.80हेक्टर क्षेत्राचा समावेश असून यामध्ये 1हजार 485 शेतकऱ्यांचा समावेश आहे नुकसान भरपायीपोटी 1 कोटी 60 लाख रूपये निधी अपेक्षीत आहे. वर्धा जिल्ह्यातील 1हजार 152.53 हेक्टर आर क्षेत्र बाधीत असून 2हजार 292 शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाई साठी अपेक्षीत निधी 1कोटी 55 लक्ष रूपये अपेक्षीत आहे.

भंडारा जिल्ह्यातील 214.70 हेक्टर क्षेत्र बाधीत असून 446 शेतकऱ्यांचा समावेश आहे नुकसान भरपायी साठी28 लाख 98 हजार रूपये निधी अपेक्षित आहे. गांदिया जिल्ह्यातील 2हजार 871.40 हेक्टर क्षेत्र बाधीत असून 4हजार 418 शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसानी साठी 3कोटी 51 लक्ष रुपये निधी अपेक्षित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 335.85 हेक्टर क्षेत्र बाधीत असून यामध्ये 721 शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाई साठी 23 लाख 26 हजार रूपये अपेक्षित आहे गडचिरोली जिल्ह्यातील 47.36 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 172 बाधीत शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईपोटी 6लाख 39 हजार रूपयांची आवश्यकता आहे.