Published On : Wed, Aug 25th, 2021

गोवा विधानसभा निवडणुक साठी सिंह यांची समन्वयक पदी नियुक्ति

नागपूर: नागपूर चे कांग्रेस पक्षाचे विश्वजीत शिवबहादुर सिंह यांची अखिल भारतीय कांग्रेस कमेटी कडून गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी समन्वयक पदी नियुक्ति करण्यात आली आहे, गोवा राज्याचे कांग्रेस चे प्रभारी व कर्नाटक चे आमदार दिनेश गुंडू राव यांनी आज जाहिर केले. या पुर्वी विश्वजीत शिवबहादूर सिंह हे बिहार राज्य विधानसभा निवडणुक 2020 चे कांग्रेस सोशल मिडीया वार रूम चे सहप्रभारी होते व बिहार राज्याचे डिजिटल सदस्यता अभियानाचे समन्वयक होते, सोबत राज्य निवडणुक आयोगाकडून कांग्रेस पक्षाचे निवडणुक संबंधी परवानगी, प्रचार साहित्य परवानगी चे ईंचार्ज ही होते.

अखिल भारतीय कांग्रेस कमेटी ने यापुर्वी ही मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक (2018) व गुजरात विधानसभा निवडणुक (2017) मध्ये ही विश्वजीत सिंह वर जवाबदारी दिलेली आहे.

गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी केंद्रिय मंत्री पी.चिदंबरम यांची निरीक्षक म्हणुन कांग्रेस ने नियुक्ति करताच 25 ऑगस्ट ला गोवा मध्ये पक्षाची निवडणुक संबंधी आढावा बैठक आहे, त्यासाठी गोवा राज्य प्रभारी श्री दिनेश गुंडू राव यांनी व प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडंणकर यांनी तैयारी केलेली आहे। विश्वजीत सिंह यांनी नियुक्ति वर अ.भा.कांग्रेस कमेटी ची अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अ. भा कांग्रेस संगठन प्रभारी के सी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, कृष्णा अल्लावरू, महाराष्ट्र राज्य कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष नाना पटोले, गोवा राज्य प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी दिनेश गुंडू राव, नागपुर जिला व शहर कांग्रेस कमेटी अध्यक्ष विकास ठाकरे, व नागपुर जिल्हा ग्रामिण अध्यक्ष राजेंद्र मुळक, नितीन राऊत, सुनिल केदार व सर्व मंत्री व आमदार सोबत सर्व कांग्रेस कार्यकर्तांचे सहर्ष आभार मानले आहे.