कामठी :-महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना कार्याध्यक्ष विश्वनाथ घुगे , राज्याध्यक्ष सुरेश पोसतडोल , सरचिटणीस रामेश्वर वाघमारे व प्रमुख संघटक दिपक रोडे आणि संघटनेच्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांनी कामठी नगर परिषद चे उत्कृष्ट कर्मचारी प्रदीप भोकरे यांची राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती बद्दल नवनियुक्त राज्य सचिव प्रदीप भोकरे यांनी राज्य कार्यकारिणीतील समस्त पदाधिकारी व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले.तसेच संघटनेच्या माध्यमातून,आपल्या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनातुन समस्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहील.असे मनोगत सुद्धा व्यक्त केले.
या नियुक्ती बद्दल राज्य सचिव प्रदीप भोकरे यांच्यावर विजय मेथीयां,रुपेश जैस्वाल, धर्मेश जैस्वाल, संजय जैस्वाल यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.