Published On : Mon, Sep 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अंकित गोपालराव गुमगांवकर यांची नियुक्ती

Advertisement

नागपूर: उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विकास कुंभारे साहेब यांच्या शिफारसी पत्राने आज अंकित गोपालराव गुमगांवकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल गुमगांवकर यांनी पालकमंत्री फडणवीस आणि आमदार विकास कुंभारे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.

विशेष कार्यकारी अधिकारी हा एक महत्वाचा सरकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य किंवा केंद्र सरकार करते. त्यांचे मुख्य काम म्हणजे प्रशासनातील विशेष कामांमध्ये मदत करणे, जसे की निवडणूक व्यवस्थापन, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतर महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि देखरेख करणे हे असते. हे अधिकारी सामान्यत: विशिष्ट काळासाठी नियुक्त केले जातात आणि त्यांच्याकडे विशिष्ट अधिकार असतात, जेणेकरून ते आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतील.

Advertisement
Advertisement

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above