
कायगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी बातमी समोर आली आहे. लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल पवार याने स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नागपूर महानगरपालिकामध्ये कर वसुली अधिकारी पदावर नियुक्ती मिळवली आहे.
अमोलच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यालयात मुख्याध्यापक अयुब शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अमोल पवार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्कार सोहळ्यास विठ्ठलराव जाधव, माजी सरपंच रोहिदास पवार, प्रदीप निरपळ, दत्तात्रय कान्हे, अनिस शेख, मुकुंद देवकर, रामभाऊ मस्के, तयब सय्यद, विठ्ठल पराड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








