Published On : Wed, Oct 27th, 2021

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गटनेता नियुक्त

नागपूर, आज दिनांक. २७/१०/२०२१ रोजी नागपूर जिल्हा परिषदेच्या गटनेते पदाची निवड मा.श्री. राजेंद्र मुळक, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.ना.श्री सुनिलजी केदार, मंत्री, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, मा.श्री. नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.सौ. रश्मी बर्वे, अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर यांच्या उपस्थितीत पार पडली.

तसेच सौ. अवन्तिक रमेश लेकुरवाळे यांची एक मताने गटनेते पदी निवड करण्यात आली. व माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे सर्व सदस्यांची गटाची नोंदणी करण्यात आली. यावेळी मा.श्री. सुरेश भोयर, माजी महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.सौ. भारती पाटील, सभापती शिक्षण, मा.सौ. नेमावली माटे, सभापती समाजकल्याण, मा.श्री. तापेश्वर वैद्य, सभापती कृषी, मा.श्री. मनोहर कुंभारे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर, सर्व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, शेकाप, गोडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.