Published On : Sat, Jun 12th, 2021

चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा

Advertisement

– महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांची आसरा कोव्हिड रुग्णालयाला भेट, सीसीटिव्ही फुटेटची केली पाहणी

चंद्रपूर : आसरा कोव्हिड रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. यात दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ९ जून रोजी गैरप्रकार केल्याचा व्हिडीओ वायरल झाला. ही बाब लक्षात येताच महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लगेच चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी शनिवार (ता. १२) सायंकाळी ५ वाजता आसरा कोव्हिड रुग्णालयाला भेट दिली.

Advertisement

यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे उपस्थित होते. मनपा पदाधिकाऱ्यांनी आसरा कोव्हिड रुग्णालयात भेटीदरम्यान उपस्थित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय, शिपाई यांच्याशी चर्चा केली. सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमून दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.