Published On : Tue, Sep 22nd, 2020

पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

नागपूर : जिल्ह्यात छायांकित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी वयाचे 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

ज्या पात्र मतदारास मतदार यादीत नाव नोंदवायचे आहे तसेच ज्या मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहेत, मतदार यादीतील मजकूर दुरुस्त करु घ्यावयाचा आहे किंवा एकाच मतदार संघात एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थानांतरीत करायचे असल्यास त्यांनी आपला अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केन्द्र कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर करावा किंवा ज्या अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे त्यांनी ceo.maharashtra.gov.in किंवा nvsp.in या वेबसाईटवर अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावा.

तसेच 1 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी सर्व पदनिर्देशित ठिकाणी अंतिमरीत्या प्रसिध्द करण्यात येणार आहे.