Published On : Fri, Feb 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गडचिरोलीत माओवादीविरोधी अभियान; तीन माओवादी ठार, एका जवानाला वीरमरण

Advertisement

गडचिरोली – महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील दुर्गम जंगल परिसरात सुरू असलेल्या व्यापक माओवादीविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले असून, दुर्दैवाने या कारवाईदरम्यान C-60 दलाचा एक जवान वीरमरण पावला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आणखी दोन माओवादींचे मृतदेह (एक पुरुष, एक महिला) सापडले. याआधी एका माओवादीचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण तीन माओवादी (दोन पुरुष व एक महिला) ठार झाल्याची खात्री झाली आहे. घटनास्थळावरून एक AK-47 आणि एक SLR रायफल जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या चकमकीत जखमी झालेल्या C-60 जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८) यांना शुक्रवारी सकाळी अबुझमाडच्या घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरद्वारे उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे आणण्यात आले होते. मात्र, मोहिमेदरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते अहेरी येथील रहिवासी असून मूळ गाव मांड्रा, दामरांचा (ता. अहेरी) आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली असून, त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या अभियानात जोगा मडावी नावाचा आणखी एक जवान गोळी लागून जखमी झाला होता. त्यालाही हेलिकॉप्टरद्वारे भामरागड येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचारांसाठी त्यांना लवकरच गडचिरोली येथे हलवण्यात येणार आहे.

घटनास्थळी आणि परिसरात शोधमोहीम अद्याप सुरू असून, जंगल भागात सुरक्षा दलांकडून सतत कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. या कारवाईबाबत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून पुढील माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement