Published On : Wed, May 5th, 2021

रेशीमबागेतील श्रद्धास्थानात अनसूयामाता जन्मोत्सव नामस्मरणात संपन्न

नागपुर– स्थानिक रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 मे रोजी महाशक्ती अनसूयामाता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे वाढत्या संक्रमणामुळे श्रद्धास्थानातील सेवकांनी व श्रद्धास्थानचे संयोजक गिरीशजी वराडपांडे यांचे उपस्थितीत महाशक्ती अनसूयामातेच्या मूर्तीचे व प्रतिमेचे औक्षण करून पूजन केले.

अनसूयामाऊलीला पंचपरिक्रमा अंबा माता की जय, दुर्गामाता की जय, बोलो अनसूयामाता की जय जय जय च्या गजरात घालण्यात आल्या. कोरोना विषाणु संक्रमणातुन मुक्तीसाठी संतकवी कमलासुत रचित महाशक्ती अनसूयामाता चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले. सकाळी माऊलीच्या मूर्तीला मंगल अभिषेक, फुलांची शेज व मंगल आरती करण्यात आली.

या प्रसंगी डाॅ श्रीरंग वराडपांडे , नरेंद्र गोरले ,प्रकाश निमजे, सुभाष मानकर , नरेश ईटनकर ,मंगला पोटे, ममता मानकर, दीपाली निमजे, सुशांत कडू, चित्रा मानकर, गंधार प्रांजली देव, समृद्धी वराडपांडे,स्वरश्री वराडपांडे, वैजयंती अटाळकर,आदींनी सहभाग घेतला.