नागपूर : जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावात आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे.तलावात पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
खिंडसी तलाव हे प्रेक्षणीय स्थळ असले तरी येथे दररोज कोणी ना कोणी आत्महत्या करत आहे. गेल्या काही दिवसंपासून याठिकाणी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा एकदा एका व्यक्तीचा मृतदेह तलावात आढळून आला. याबाबत नागरिकांनी रामटेक पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पोलीस आणि वाईल्ड चॅलेंजर संघटनेच्या मदतीने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खिंडसी तलावातून पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या बॅगेतील आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटली.
मृत संजय टेंभरे हे गोंदिया जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आहे. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तो खिंडसी तलाव परिसरात पोहोचला होता. त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.