Published On : Fri, Sep 8th, 2017

“आपली बस”च्या ताफ्यात आणखी 5 ग्रीन बस दाखल

Advertisement

नागपूर, ता. 8 सप्टेंबर: शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि आरामदायी परिवहन सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या मनपाच्या आपली बस सेवेच्या ताफ्यात आज (ता. 8) रोजी आणखील 5 ग्रीन बस दाखल झाल्या असल्याची माहिती परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे यांनी दिली.

सध्या शहरातील विविध मार्गावर 5 ग्रीन बस सुरू आहे. तसेच शहरातील इतर मार्गावरही ग्रीन बस सेवा सुरू करण्यात याव्या अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांना दर्जेदार दळणवळण व्यस्था उपलब्ध करून देत असताना प्रदूषण नियंत्रणही आपली जबाबदारी लक्षात घेता ग्रीन बस सुरू करण्यात येत आहे. आपली बस अंतर्गत 5 बस सुरू असून आज आलेल्या 5 बस गृहीत धरून 10 बसेस नागपूरकरांच्या सेवेत उपलब्ध झाल्या आहेत.

तसेच या महिन्याच्या शेवट पर्यंत आणखी 10 ग्रीन बस शहरात दाखल होणार आहे. तसेच उर्वरित बसेस प्रेत्येक महिन्यात 15 बसेस या प्रमाणे आपली बस च्या ताफ्यात दाखल होणार आहे. रेल्वे स्थानक ते विमानतळ, रेल्वे स्थानक ते शहरातील प्रमुख ठिकाण, विमानतळ ते शहरातील प्रमुख ठिकाणा जोडण्यात येणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये

– संपूर्ण वातानुकुलीत बस

– प्रदूषण विरहीत ग्रीन फ्युल

– रिअर इंजिन (जर्क फ्री प्रवास)

– स्वयंचतिल गीअर

– लो फ्लोअर बॉडी

– सीसीटिव्ही कॅमेरा

– एयर सस्पेंशन

– जीपीएस स्टॉर डिस्प्ले

– व्हेईकल ट्रॉकिंग सिस्टीम