Published On : Thu, Aug 1st, 2019

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ९९ वी जयंती साजरी

कन्हान : – सत्यशोधक संघ कन्हान च्या वतीने संताजी नगर कांद्री- कन्हान येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ९९ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.

गुरुवार (दि.०१) ला धर्मराज विद्यालयाच्या मागे संताजी नगर वार्ड क्र ६ कांद्री येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास सत्यशोधक संघाचे सतिश भसारकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय घोष करण्यात आला.

रजनीश (बाळासाहेब) मेश्राम हयानी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अखिलेश मेश्राम हयानी तर आभार प्रदर्शन सोनु मसराम यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने मनीष भिवगडे, शरद वाटकर, विश्व्जीत गायकवाड, साहिल, अशोक नारनवरे, पवन सोनोने, दिनेश नारनवरे, विजय सोनोने आदी सह जागृत युवा वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.