Published On : Tue, Aug 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Advertisement

नागपूर : विधानसभेची निवडणूक तोंडावर सर्व राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहे. यातच नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता स्वतः अनिल देशमुख भाष्य करत प्रतिक्रिया दिली.

मी कधीही एकटा निर्णय घेत नाही. पक्षाकडून जे काही आदेश दिले जातात, त्यावर मी निर्णय घेतो, असे अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. सध्या सर्वच महत्त्वाच्या पक्षांचे नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येताना दिसत आहेत. पक्षाचे काही कार्यकर्ते आणि आमदार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनीही उमेदवारांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.