Published On : Mon, May 14th, 2018

अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात

पुणे: अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे जखमी झाली आहे. प्रार्थनाच्या हाताला दुखापत झाली आहे.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनिकेत आणि प्रार्थना हे दोघे आगामी मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

दरम्यान, जखमी प्रार्थना बेहेरेला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या गाडीत अनिकेत, प्रार्थनासह ड्रायव्हर आणि प्रार्थनाची सहाय्यक होती. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोचा अंदाज न आल्याने, तो चुकवण्याच्या नादात अनिकेत-प्रार्थनाच्या गाडीला अपघात झाला.

“मी पुढच्या सीटवर होतो. मी बेल्ट लावून बसलो होतो, त्यामुळे मला दुखापत झाली नाही. अपघात भीषण होता. बाजूलाच दरी होती, सुदैवाने आम्ही वाचलो. प्रार्थनाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.” असं अनिकेत विश्वासरावने एबीपी माझाला सांगितलं.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement