Advertisement
नवी दिल्ली : मोदी सरकारचे केंद्रातील चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुद्रा योजनेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
मिळालेल्या माहिती नुसार संबधितांची यादी आधीच केंद्राकडे पाठवण्यात आली होती. वेगवेगळ्या भागातील लाभार्थींशी संवाद साधल्यावर पंतप्रधान महाराष्ट्राकडे वळाले.
यावेळी त्यांनी नाशिकच्या एका माणसाशी मराठीतून संभाषण सुरू केलं – “हरी ठाकूर कोण आहेत? कुठले राहणारे आहेत?” असा प्रश्न पंतप्रधानांनी मराठीतून विचारला.
तेव्हा मूळचे बिहारचे आणि नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असलेले ठाकूर यांची पंचाईत झाली. त्यांनी आपल्याला मराठी समजत नसून कृपया हिंदीतून संवाद साधावा, अशी विनंती पंतप्रधानांना केली.