Published On : Mon, Mar 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या अनन्या व्यवहारेची राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड!

पंतप्रधान यांच्या ‘मन की बात’मध्ये उपक्रमाचा गौरव
Advertisement

नागपूर– नागपूरमधील विद्यार्थिनी अनन्या व्यवहारे हिने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीतर्फे चालविण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड (IJSO) प्रशिक्षण बॅचमधील अनन्याची बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘प्रयोगा इन्स्टिट्यूट’च्या संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या उपक्रमाचा विशेष उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.

देशभरातून सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांपैकी निवड झालेल्या अवघ्या २०० विद्यार्थ्यांमध्ये अनन्याचा समावेश आहे. सध्या ती ‘प्रयोगा इन्स्टिट्यूट’मध्ये दोन महिन्यांच्या सघन संशोधन प्रशिक्षणात सहभागी झाली असून, तिला प्रगत प्रयोगशाळा तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि ‘इन्क्वायरी बेस्ड लर्निंग’चे प्रत्यक्ष शिक्षण मिळत आहे.

प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीच्या संचालिका डॉ. सीमा उबाळे यांनी अनन्याचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, संस्थेचे प्रा. डॉ. गोविंद लखोटिया यांनी सांगितले की, IJSO प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि संशोधन कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो.

Advertisement

दरम्यान, या उपक्रमाच्या पुढील बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होणार असून, इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार आहे. निवड झालेल्या ३० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभराचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच देशभरातील नामांकित तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.