
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रात मासे पकडण्यास गेलेल्या गोताखोर युवकाना नदीत तैरताना एका अनोळखी इसमाचा प्रेत दिसुन आल्याने कन्हान पोलीसाना माहीती देऊन नदीतुन बाहेर काढुन पोलीसाच्या ताब्या त देण्यात आले. अनोळशी पुरूषाचे मुतदेह मिळाल्या ने परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवार (दि.६) ला दुपारी ३ ते ५ वाजता दरम्यान काही गोताखोर युवक नामे राकेश मेश्राम, अजय बावने, प्रकाश डोंगरे हे मासे पकडण्यासाठी कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रात गेले असता त्यांना नदी मध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत तैरतांना दिसुन आले. त्यांनी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन घटनेची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचुन पोलीसांनी गोताखोर युवकांच्या मदतीने अनोळखी इसमाचा मृत देह नदी पात्रातुन बाहेर काढला.
कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह आपल्या ताब्या त घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा ग्रामि ण रुग्णालयात नेण्यात आला. सदर अनोळखी पुरूषा चा मुतदेहअंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाचा असुन मुतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. कमरेत लक्स विनर्स कंपनी ची कथीया रंगाची ९० सें मी. ची अंडरपॅंट आहे व काळ्या रंगाची एफजी स्पोर्ट असे नमुद असलेली फुल पॅंट घातलेली असुन उंची अंदाजे ५ फुट ८ इंच आहे. अनोळखी मृतकास कोणी ओळखत असल्यास कन्हा न थानेदार विलास काळे मो न ९८६७११२१८५ वर संपर्क करून मृतकास ओळखण्यास सहकार्य करावे. पुढील तपास पो नि विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




