नागपूर: शहरात मकरसंक्रांतीनिमित्त पंतगोत्सवाला उधाण आले होते. मात्र, ही पतंगबाजी पक्ष्यांच्या जीवावर बेतली. मकर सक्रांतीच्या सणाचा उत्साह संपल्यानंतरही उडवल्या जाणाऱ्या पतंगाच्या मांज्यामुळे इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाच्या आवारात एक दुर्लभ प्रजातीचे घुबड जखमी अवस्थेत आढळले.
मानसिंग थापरिया ( लिपिक मेयो रुग्णालय) यांनी नागपुरातील सेमिनरी हिल्स ॲनिमल रेस्क्यु सेंटर, येथे संपर्क केला घुबडास त्यांना सुपूर्द केले.
पतंगाच्या नायलॉन मांजामुळे घुबड पक्षाच्या पंखांना इजा झाली असून त्याच्यावर उपचार झाल्यावर त्याला सोडून देणार असल्याचे ॲनिमल रेस्क्यु सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.