Published On : Thu, Feb 1st, 2018

‘एक शाम शहीदों के नाम’ मुशायरा व कवी संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे महाल येथे आयोजित ‘एक शाम शहीदों के नाम’ या शीर्षकांतर्गत झालेल्या मुशायलरा आणि कवी संमेलनाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यामध्ये देशातील नामवंत शायर आणि कवी सहभागी झाले होते.

यानिमित्त आयोजित उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे वीरेंद्र शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेविका नेहा वाघमारे, राजेश मुधोजी भोसले, ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, भाजपा मध्य नागपूरचे अध्यक्ष बंडू राऊत, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, अधिकारी संजय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक रज्जाक कुरेश यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.


कार्यक्रमाची सुरुवात उर्दू साहित्यातील विख्यात शायर अब्दुल वाहीद अंसारी द्वारा ‘नात-ए-पाक’ या रचनेच्या सादरीकरणाने झाले. संपूर्ण कवी संमेलानात शायर इरशाद अंजुम यांनी आपल्या बहादरदार संचालनाने रंगत आणली. मंजर भोपाली, मिशम गोपालपुरी, परवाज इलाहबादी, अलताफ जिया, वाहीद अंसारी, कवयित्री मधु गुप्ता, शायर वारिस वारसी, जमील साहिर, कमर एजाज, इश्तेयाक कामिल, इरशाद अंजुम, डॉ. खालिद नैयर, इमरान फैज, जमील असमद जमील मुशायरा आणि कविसंमेलनात सहभागी झाले होते.