
नागपूर: शहरात बलात्कारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर चहाटपरी चालकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वसतीगृहासमोर असलेल्या चहाटपरीवर चहा घेण्यासाठी येणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चहाटपरी चालकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अश्लील फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नीलेश पंढरी कळंबे (३५) रा. एमआयडीसी असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित तरुणी गडचिरोली येथे राहते. ती हिंगणा मार्गावरील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. एमआयडीसी परिसरात ती भाड्याने खोली घेऊन राहते. आरोपी नीलेशची परिसरातच चहाटपरी होती. तरुणीसुद्धा दररोज त्या दुकानात चहा पिण्यासाठी जात होती. या दरम्यान नीलेशशी तिची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. नीलेशने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले.
तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान काही अश्लील फोटोही काढले. दरम्यान पीडितेने लग्नासाठी दबाव टाकल्याने निलेशने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाच्यता केल्यास अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून नीलेशला बेड्या ठोकल्या आहेत.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




