
नागपूर : अभियांत्रिकीच्या परीक्षेत दोनदा नापास झाल्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत वैशालीनगरात घडली. संदेश अशोक बोकडे (वय २४, रा. सिटी प्लाझा अपार्टमेंट) असे मृताचे नाव आहे.
माहितीनुसार , संदेश अंजुमन कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सहाव्या सेमिस्टरच्या काही विषयांमध्ये तो नापास झाला होता. पुन्हा परीक्षा दिल्यानंतरही त्याला यश आले नाही. यामुळे तो नैराश्येत गेला होता. मंगळवारी रात्री संदेशने आई-वडिल आणि बहिणीसोबत एकत्र बसून जेवण केले.त्यानंतर तो झोपण्यासाठी खोलीत गेला.
मध्यरात्रीला त्याने छताच्या पंख्याला ओढनी बांधून गळफास लावला. सकाळी ५ वाजताच्या सुमारास वडील अशोक मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी उठले असता मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पाचपावली पोलिस घटनास्थळावर पोहोचले असून पंचनामा केला. तसेच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




