Published On : Mon, Jul 19th, 2021

अजनी रेल्वे जलवाहिनी वरील गळती दुरुस्त करण्यासाठी ८ तासांचे तातडीचे शटडाऊन आज

अजनी रेल्वे परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल (GMCH), टाटा कॅपिटोल आणि रामबाग म्हाडा परिसर पाणी उरवठा २० जुलै (मंगळवार) बाधित राहणार

नागपूर: अजनी रेल्वे मुख्य जलवाहिनीवर फार मोठी गळती सोमवारी आढळून आली आहे . ह्या गळतीला तातडीने बंद करण्याकरिता नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी तातडीचे ८ तासांचे शटडाऊन २० जुलै (मंगळवार ) रोजी दुपारी १२ ते रात्री ८ दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.

या शटडाऊनमुळे मंगळवारी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: अजनी रेल्वे परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल (GMCH), टाटा कॅपिटोल आणि रामबाग म्हाडा वसाहत परिसर

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठा ही शक्य होणार नसल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे असे आवाहन मनपा-OCWने केले आहे.