Advertisement
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत हिवरी नगर ते संघर्ष नगर दरम्यान एका १८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तुषार किशोर इंगळे असे मृत तरुणाचे नाव असून तो गंगाबाई घाट येथील गुजर नगर येथे राहणारा आहे.
माहितीनुसार, पोलिसांना आज सकाळी या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृत तरुणाचा आरोपींशी वाद झाला असावा, ज्यानंतर देशी दारूच्या दुकानासमोरच त्याचा खून करण्यात आला.
नंदनवन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.