Published On : Tue, Mar 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

अमरावती हादरले; भानखेडा रोडवर सामूहिक अत्याचार; पाच आरोपी पोलिस कोठडीत

पीडितेची प्रकृती गंभीर
Advertisement

अमरावती : शहरातील भानखेडा रोड परिसरात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत (PCR) पाठवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तपासादरम्यान आरोपींनी अत्याचाराच्या वेळी अश्लील व्हिडिओही तयार केल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाची भीषणता अधिकच वाढली आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. घटनेनंतर शहरभर संताप व्यक्त केला जात असून नागरिकांकडून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.