Published On : Wed, Apr 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण : मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूरमध्ये धिंड !

पुराव्यांच्या शोधासाठी पोलिसांचा तपास वेगात
Advertisement

अमरावती– जिल्ह्यातील परतवाडा परिसरात तरुणींच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडालेल्या प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. आरोपीला आज अचलपूरमधील समरसपुरा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्याची शहराच्या प्रमुख मार्गांवरून धिंड काढली.

या कारवाईमागे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला भररस्त्यातून फिरवताना मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती.

दरम्यान, तपासादरम्यान अयान अहमदने काही महत्त्वाच्या वस्तू आपल्या मित्राकडे लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या वस्तूंमध्ये मोबाईल, मेमरी कार्ड किंवा इतर डिजिटल पुरावे असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांचा शोध सुरू आहे.

समरसपुरा पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणाचा हातभार होता का, याचाही तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.