| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 11th, 2017

  अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न

  Amit
  मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.

  अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होत आहे.

  विशेष म्हणजे, आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


  कोण आहे मिताली बोरुडे?

  मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.

  राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

  अमित ठाकरे राजकारणापासून अलिप्त

  अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता. अमित ठाकरेंनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून वाणिज्या शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145