Published On : Tue, Mar 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अमित शहा अकाेल्यात दाखल ;विदर्भातील सहा मतदारसंघांचा घेणार आढावा!

Advertisement

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अकाेल्यात दाखल झाले. शाह हे अकोल्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत विदर्भातील सहा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेणार आहे.

येत्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शाह अकोल्यात बैठक घेत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अकोला विमानतळावर आगमन झाले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते. अकोल्यात दाखल होताच शहा यांनी शिवणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.