Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

योगासन मध्ये अमित, युनिटी स्पोर्ट्स अजिंक्य खासदार क्रीडा महोत्सव योगासन स्पर्धा

Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील योगासन स्पर्धेमध्ये अमित स्पोर्ट्स असोसिएशन आणि युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने अजिंक्यपद प्राप्त केले. मुले आणि मुलींच्या गटात दोन्ही संघांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शनातून यश मिळविले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली.

मुलांच्या गटात सर्वाधिक ३५ गुण प्राप्त करुन अमित स्पोर्ट्स अकादमीने प्रथम क्रमांक पटकाविला. तर २५ गुणांसह नेहरू क्रीडा मंडळाने दुसरा क्रमांक आणि १५ गुणांसह यूनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने तिसरा क्रमांक प्राप्त केला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुलींच्या स्पर्धेत यूनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने सर्वाधिक ५० गुण प्राप्त करुन बाजी मारली. अमित स्पोर्ट्सला ४५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. १० गुणांसह वाय.के. ग्रूपने तिसरे स्थान प्राप्त केले.

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक संदेश खरे, समन्वयक भगवान मेंढे, प्रणय कांगले, अमित मोहगावकर, भूषण टाके आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement